केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG सिलिंडरच्या आयातीवर वाढवली कस्टम ड्युटी !

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG सिलिंडरच्या आयातीवर वाढवली कस्टम ड्युटी !

केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरवरील बेसिक कस्टम ड्युटीमध्ये मोठी वाढ केली आहे. एलपीजी सिलिंडरवरील बेसिक कस्टम ड्युटी 5 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आली आहे. याशिवाय आता कृषी पायाभूत सुविधा आणि विकास सेस (AIDC) देखील लागू केला जाणार आहे. त्यामुळे आता LPG सिलिंडरच्या आयातीवर 15% सेस आकारला जाणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्यांद्वारे घरगुती ग्राहकांना विकल्या जाणार्‍या एलपीजीच्या आयातीवर कस्टम ड्युटी शून्य असेल. इतर आयातदार किंवा जे देशांतर्गत एलपीजी आयात करतात त्यांच्यावर कस्टम ड्युटी 15 टक्के राहणार आहे. तसेच सरकारने लिक्विफाइड प्रोपेन आणि लिक्विफाइड ब्युटेनच्या मिश्रणावर कोणतेही बेसिक कस्टम ड्युटी लावली जाणार नाही असा निर्णय घेतला आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारने हा एक दिलासा दिला आहे. पेट्रोलियम विभाग आणि कर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारचे हे पाऊल देशांतर्गत ग्राहकांच्या हिताचे रक्षण करेल आणि त्यासोबतच आयातीचा खर्चही कमी होण्यास मदत होईल.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment