Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा वाढले

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा वाढले

Gold Price Today : भारतात सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी वाईट बातमी आली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात विक्रमी झेप नोंदवली गेली आहे. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार बुधवारी भारतात सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्यासाठी ५५ हजार ७१९ पर्यंत वाढला असून २२ कॅरेटच्या ८ ग्रॅम आणि १० ग्रॅम सोन्याचा भाव २४० आणि ३०० रुपयांनी वाढून अनुक्रमे ४४,५६० आणि ५५,७०० रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या व्यापार सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्यामुळे राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्या आणि चांदीचा भाव वाढीसह बंद झाला होता.

मंगळवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव २८० रुपयांनी वाढून ६०,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव ४७० रुपयांनी वाढून ७४,९५० रुपये प्रति किलोवर बंद झाला. मंगळवारी सोन्याच्या भावात वाढ झाली असून कॉमेक्सवर किंमतीत किरकोळ वाढ नोंदवली.

सोन्याचे भाव येथे क्लिक करून पहा

Leave a Comment