केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार State Employees DA News टक्के महागाई भत्ता वाढ त्यानुसार अनुज्ञेय केली गेली आहे. अर्थातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र अद्याप राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना तूर्तास 34 टक्के दराने महागाई भत्ता लाभ मिळत आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढ मिळावी यासाठी कामगार संघटनेकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात आहे State Employees DA
दरम्यान आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या State Employees DA News दाव्यानुसार महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना देखील लवकरच 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजे महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ अपेक्षित आहे. आता, राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सदरच्या प्रस्तावावर हिवाळी अधिवेशनादरम्यान विचार होऊ शकतो असे देखील मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत State Employee
DA News.