Msrtc st bus smart cart महाराष्ट्र राज्य एसटी महा परिवहन मंडळाच्या विविध तिकीट सवलती अंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड सोबत बाळगणे बंधनकारक आहे. एक एप्रिल पासून स्मार्ट कार्ड सोबत बाळगणे बंधनकारक आहे.एसटी महामंडळाकडून 31 मार्च पर्यंत स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी बंधनकारक होते,31 मार्च पर्यंत स्मार्ट कार्ड काढण्याची मुदत देण्यात आली होती.
मात्र गेल्या दोन-तीन वर्षापासून स्मार्ट कार्ड नोंदणी वाटप प्रक्रिया ही रडत पडत सुरू आहे.सध्या मागील अनेक महिन्यापासून स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प झाली असून एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मुदत सारखी-सारखी देण्यात येत आहे.मात्र अद्याप देखील अनेक ठिकाणी कितीतरी महिन्यापासून तांत्रिक अडचणीमुळे स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी
येथे क्लिक करा
Msrtc st bus smart cart महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 29 सामाजिक विविध घटकांना एसटी बस मधून प्रवास करण्यासाठी २५ टक्के पासून ते शंभर टक्के पर्यंत टिकीट भाड्यात सवलत देण्यात येत आहे.विविध गटातील प्रवासासाठी सवलतीचे मास्टर कार्ड म्हणून एसटी महामंडळाने तिकीट समिती सुरू केलेली आहे.
स्मार्ट कार्ड योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्याच्या अनेक ठिकाणी कधी सर्व डाऊन कधी तांत्रिक अडचणीमुळे स्मार्ट कार्ड नोंदणी बंद असल्याचे फलक बस स्थानकावरील खिडकीवर लावण्यात आलेले आहे.एसटी आगारांमध्ये नोंदणी प्रक्रिया बंद असल्या मुळे ज्येष्ठ नागरिक व इतर प्रवाशांना सारख्याच चकरा मारायला लागत आहेत. नवीन कार्ड निघणार नाही फक्त जुन्या कार्डचे नूतनीकरण करून दिले जाईल असे बऱ्याच एसटी महामंडळाच्या आगारात सांगू लागले होते.
Crop insurance:400 कोटी विम्याची यादी आली तात्काळ जिल्हा निहाय यादीत नाव चेक करा.
Msrtc st bus smart cart आता नूतनीकरणाचे काम आता बऱ्याच ठिकाणी बंद पडले आहे स्मार्ट कार्ड बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विचारना केली असता त्यांच्याकडून सुद्धा ठोस माहिती मिळत नाही.पुण्या मुंबई कडील कंपनीला स्मार्ट कार्ड बनवण्याचे कॉन्टॅक्ट देण्यात आले होते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे स्मार्ट कार्ड बनवायचे काम ठप्प झाले आहे.असे काही वरिष्ठ अधिकारी सांगतात मात्र ही तांत्रिक अडचण दुरुस्त होऊन पुन्हा कधी सुरू होऊ शकेल याचे उत्तर कोणाकडे कोणाकडेच नाही